महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्लावरील ही शिवनेरी लेणी आहेत. ह्यांत सुमारे ८४ लेण्यांचे खोदकाम आहे.
शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला जुन्नरचा शिवनेरी किल्ला हा सर्वांच्या परिचयाचा आहे, पण तेथील लेणी फारशी परिचयाची नाहीत. शिवनेरी किल्ल्यावर ६० बुद्ध लेणी आहेत. भारतातील सर्वात जास्त लेणी महाराष्ट्रात आहेत आणि त्यातली बहुसंख्य एकट्या जुन्नर तालुक्यामध्ये आहेत. शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त लेणी पहायला मिळतात.
महाराष्ट्रातून शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात परंतु खूप कमी असे पर्यटक आहेत की जे साखळदंडाच्या मार्गाने किल्ल्यावर जातात. या मार्गावर काही लेणी आहेत.
शिवनेरी लेणी
या विषयातील रहस्ये उलगडा.