भाजे लेणी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

भाजे लेणी

भाजे लेणी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील भाजे गावाजवळील डोंगरातील प्राचीन हिन्दू आणि बौद्ध लेणी आहेत.यामध्ये बौद्ध स्तूप आणि त्याचप्रमाणे यक्ष, गंधर्व, इंद्र व सूर्याची शिल्पे आहेत. गावाजवळ ४०० फूट उंचीवर ही लेणी आहेत. येथील चैत्यगृह महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या बाजूला भिक्खूंना राहण्यासाठी असलेल्या खोल्या आढळतात. या लेण्यांना २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

हा लेण्यांचा समूह सुमारे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील असावा. येथे एकूण २२ लेणी आढळतात. त्यात एक चैत्यगृह व २१ विहार आहेत. या लेणी मुळे महाराष्ट्र राज्याला खूप पर्यटक मिळतात. येथे रोज एक लाख ते दोन लाख पर्यटक येतात. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण द्वारे अधिसूचना क्रमांक 2407-A द्वारे हे लेणे महत्वाचे राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित आहे. हे महाराष्ट्रातील लेणे बौद्ध हिनायन पंथाचे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →