खरोसा लेणी, ही लेणी लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातील खरोसा या गावात आहे. लातूर-निलंगा रस्त्यावर लातूरपासून ४५ किमी अंतरावर व धाराशिव लेण्यांपासून सु. ८२ किमी. अंतरावर ही लेणी आहेत. लेण्यांच्या पायथ्याशी असणाऱ्या खरोसा या गावामुळे ही लेणी ‘खरोसा लेणी’ म्हणून प्रसिद्ध आहे. एका जांभा (लॅटेराइट) खडकाच्या डोंगराच्या मध्यावर ही लेणी कोरण्यात आलेली आहेत. यामध्ये एकूण १२ लेणींचा समूह आहे. डोंगराच्या दुसऱ्या बाजूस बुद्ध मुर्त्या कोरलेले आहेत आणि तिथे बुद्ध लेण्या आहेत .
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →खरोसा लेणी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.