मिलान माल्पेन्सा विमानतळ (इटालियन: Aeroporto di Milano-Malpensa) (आहसंवि: MXP, आप्रविको: LIRF) हा इटली देशाच्या मिलान शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मिलान शहराच्या ४० किमी वायव्येस स्थित असलेला हा विमानतळ २०११ साली रोमच्या लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळाखालोखाल इटलीमधील दुसऱ्या क्रमांकाचा तर युरोपमधील २१व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. २००८ सालापर्यंत अलिटालिया कंपनीचा प्रमुख हब येथेच स्थित होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माल्पेन्सा विमानतळ
या विषयातील रहस्ये उलगडा.