मार्सेल (फ्रेंच: Marseille; उच्चार ; ऑक्सितान: Marselha) हे फ्रान्स देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे (पॅरिस खालोखाल) शहर आहे. मार्सेल शहर फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते फ्रान्सचे सर्वात मोठे बंदर आहे. मार्सेल फ्रान्सच्या प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशाचे व बुश-द्यु-रोन विभागाचे राजधानीची शहर आहे.२०११ साली मार्सेल शहराची लोकसंख्या सुमारे ८.५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १७.२० लाख इतकी होती.
२०१३ साली मार्सेल युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते.
मार्सेल
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.