मॉंतपेलिए (फ्रेंच: Montpellier; लेखनभेद: मॉंपेलिये) ही फ्रान्समधील लांगूदॉक-रोसियों ह्या प्रदेशाची राजधानी व फ्रान्समधील आठवे मोठे शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून मार्सेल व नीस खालोखाल भूमध्य किनाऱ्यावरील ते फ्रान्सचे तिसरे मोठे शहर आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे २.६५ लाख होती.
लीग १ ह्या फ्रान्सच्या सर्वोत्तम फुटबॉल लीगमध्ये खेळणारा मॉंपेलिये एच.एस.सी. हा क्लब येथेच स्थित आहे. येथील स्ताद देला मोसॉं ह्या स्टेडियममध्ये १९९८ फिफा विश्वचषकामधील सामने खेळवले गेले होते.
माँतपेलिए
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.