मार्लन ब्रॅंडो, जुनियर (एप्रिल ३, इ.स. १९२४ - जुलै १, इ.स. २००४) हा ऑस्कर पारितोषिक विजेता अमेरिकन चित्रपट अभिनेता होता.
पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ चित्रपटांतून काम करणाऱ्या ब्रॅंडोला इतिहासातील सगळ्यांत प्रभावी अभिनेत्यांपैकी एक मानले जाते. त्याला ए स्ट्रीटकार नेम्ड डिझायर व ऑन द वॉटरफ्रंट या चित्रपटांकरता प्रसिद्धी मिळाली. याशिवाय द गॉडफादर या चित्रपटातील व्हिटो कॉर्लियोन व अपॉकॅलिप्स नाऊ या चित्रपटातील कर्नल वॉल्टर ई. कर्ट्झ या त्याच्या भूमिकांनाही दाद मिळाली. यातील पहिले दोन चित्रपट १९५० च्या दशकात एलिया कझानने तर दुसरे दोन चित्रपट १९७० च्या दशकात फ्रांसिस फोर्ड कोप्पोलाने दिग्दर्शित केले होते.
मार्लन ब्रँडो
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.