ॲनिमे

यामागील विज्ञान आणि इतिहास.

ॲनिमे

आनिमे, (जपानी : アニメ; इंग्लिश : Anime) ह्या कलेचा उदय जपानमध्ये झाला.

सगळ्यात पहिले जपानी ॲनिमेशन चित्र इ.स. १९१७मध्ये काढले गेल्याची नोंद आहे. ह्यानंतरच्या दशकांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची जपानी चलचित्रे काढण्यात आली. मात्र विशिष्ट प्रकारची ॲनिमे शैली इ.स. १९६० च्या दशकात उदयास आली. ह्यात महत्त्वाचे योगदान असलेले ओसामू तेझुका. ह्यांचे काम इ.स. १९८० च्या दशकांनंतर जपानबाहेर पसरू लागले .

मांगा(???) प्रमाणेच ॲनिमेची लोकप्रियता जपानमध्ये भरपूर आहे. तसेच जगभरातही त्याचे चाहते आहेत. ह्याचे वितरक ॲनिमेचा प्रसार दूरचित्रवाणीच्या मदतीने करू शकतात. इंटरनेटचा वापरही ॲनिमेशनच्या प्रसारासाठी होतो.

जपानी भाषेतल्या アニメーション (आनिमेशों) (animēshonचा), इंग्रजीतील animation ("अ‍ॅनिमेशन"चा) किंवा फ्रेंच भाषेतील animeé ("अनिमेटेड")चा ॲनिमे हा संक्षेप आहे.

ॲनिमेचे दोन प्रकार अस्तित्वात आहेत. एक हाताने काढलेले व दुसरे संगणकाच्या मदतीने बनवलेले. ह्ंयाचा वापर दूरचित्रवाणीवरच्या मालिका, चित्रपट, चित्रफिती, व्हीडिओ गेम्स, जाहिराती आणि इंटरनेटवरील क्लिप्स ह्या करिता होतो . जपानबाहेर ॲनिमेला सर्वांत पहिल्यांदा पूर्व आणि आग्नेय आशियामध्ये लोकप्रियता मिळाली, मग हळूहळू ते जगभर लोकप्रिय झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →