नारुतो (दूरचित्रवाणी मालिका)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

नारुतो (दूरचित्रवाणी मालिका)

नारुतो ही जपानी ॲनिमे टेलिव्हिजन मालिका आहे. जी याच नावाच्या मासाशी किशिमोटोच्या मंगा मालिकेवर आधारित आहे. ही कथा नारुतो उझुमाकी या नावाच्या कथानकावर आधारीत आहे. तो एक तरुण निन्जा आहे. त्याला त्याच्या समवयस्कांमध्ये स्वतःची ओळख बनवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचे त्याच्या गावाचा नेता होकेज बनण्याचे स्वप्न असते. मंगा प्रमाणेच ही ॲनिमे मालिका दोन स्वतंत्र भागांमध्ये विभागली गेली आहे: पहिली मालिका मूळ मांगाचे शीर्षक राखून ठेवते आणि नारुतोच्या किशोरवयीन वर्षांमध्ये सेट केली जाते. दुसरी मालिका, नारुतो: शिप्पुडेन, नावाच्या सिक्वेलमध्ये त्याच्या किशोरवयातील हरकती दाख्वल्या आहेत. दोन्ही ॲनिम मालिका पियरोट द्वारे ॲनिमेटेड होत्या, ॲनिप्लेक्स द्वारे निर्मित होत्या. विझ मीडियाला उत्तर अमेरिकेत परवाना मिळाला होता.

पहिली ॲनिमे मालिका टीव्ही टोकियोवर प्रसारित झाली. ऑक्टोबर २०२२ ते फेब्रुवारी २००७ या कालावधीत २२० भागांमध्ये दाखवली गेली होती. विझ मीडियाद्वारे निर्मित इंग्रजी भाषांतरीत सप्टेंबर २००५ ते डिसेंबर २००९ या कालावधीत कार्टून नेटवर्क आणि वायटीव्ही वर प्रसारित झाला. दुसरी मालिका, नारुतो:शिप्पूडेन, टीव्ही टोकियोवर देखील प्रसारित झाली आणि फेब्रुवारी २००७ ते मार्च २०१७ या कालावधीत ५०० भागांमध्ये दाखवली गेली. नारुतो:शिपूडेनचे इंग्रजी भाषांतर ऑक्टोबर २००९ ते नोव्हेंबर २०११ या कालावधीत युनायटेड स्टेट्समधील डीस्ने एक्सडी वर प्रसारित करण्यात आला. पहिल्या भागापासून सुरू होऊन जानेवारी २०१४ मध्ये ॲडल्ट स्विमच्या टूनामी प्रोग्रामिंग ब्लॉकवर स्विच करण्यापूर्वी पहिले ९८ भाग प्रसारित केले गेले. डीस्ने एक्सडी ने मालिका प्रसारणातून काढून टाकल्यानंतर, विझ मीडिया ने डिसेंबर २०१२ मध्ये एपिसोड ९९ पासून त्यांच्या स्ट्रीमिंग सेवेवर नियॉन ॲलीवर नवीन इंग्रजी डब केलेले भाग प्रवाहित करण्यास सुरुवात केली. मार्च २०१६ मध्ये ३३८ भागांनंतर सेवा बंद झाली. त्यानंतर ही मालिका एक महिन्यासाठी बंद झाली होती. ॲनिम टेलिव्हिजन मालिकेव्यतिरिक्त, पियरोटने ११ ॲनिमेटेड चित्रपट आणि १२ मूळ व्हिडिओ ॲनिमेशन (ओव्हीए) देखील विकसित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →