मार्गम ही भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यशैलीत कार्यक्रम करताना विशिष्ट क्रमाने रचना सादर करण्याची पद्धत आहे. त्या क्रमाला ' मार्गम' असे म्हणतात. नृत्यकलेचे अंतिम साध्य हे रसनिर्मिती आहे व त्यासाठी मार्गम ही एक संकल्पना, एक आराखडा, एक मूलभूत कल्पना आहे. नृत्याचा अपेक्षित परिणाम साधण्यासाठी मार्गम ही योजना आहे.'
भरतनाट्यम नृत्यातील नृत्त आणि अभिनयाचा समतोल ,रती ,वात्सल्य आणि भक्ती या तिन्ही भावनांचा परिपोष या तत्त्वांचा विचार करून मार्गम मध्ये विविध नृत्य रचनांचा समावेश केलेला असतो.
'मार्गम ' ही संकल्पना १८ व्या शतकात तंजावूर बंधू नावाने प्रसिद्ध असलेल्या चेन्नया,पोनैया,शिवानंद आणि वडिवेल्ल बंधूंनी निर्माण केली. मराठी राजे सरफोजीराजे भोसले यांच्या दरबारातील हे बंधू नृत्य संरचनाकार आणि वाग्येकार होते.त्यांनी नृत्याला एक आकृतीबंध दिला. नियम घालून दिले आणि दासीअट्टम किंवा सदीरअट्टम हे नाव बदलून भरतनाट्यम हे नाव दिले.
मार्गम मध्ये सुरुवातीला शुद्ध नर्तनाच्या रचना केल्या जातात. त्यानंतर नृत्तामध्ये सुरांचा,शब्दांचा समावेश होत जातो.पारंपारिक पद्धतीनुसार नर्तकी सुरुवातीला नमस्कार करते. पुष्पांजलीतून देवतांना आणि रंगमंचावर फुले अर्पण करण्याचा प्रघातही आहे. त्यानंतर क्रमाने येणाऱ्या रचना या प्रमाणे-
मार्गम संकल्पना
या विषयावर तज्ञ बना.