मार्क रफालो

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मार्क रफालो

मार्क ॲलन रफालो (२२ नोव्हेंबर १९६७) हा एक अमेरिकन अभिनेता आहे. त्याने १९९० च्या दशकाच्या सुरुवातीस अभिनय करण्यास सुरुवात केली आणि दिस इज अवर यूथ (१९९८) आणि यू कॅन काउंट ऑन मी (२०००) या नाटक चित्रपटांमधील कामाने तो प्रसिद्ध झाला. त्याने रोमँटिक विनोदी चित्रपट थर्टीन गोइंग ऑन थर्टी (२००४), जस्ट लाइक हेवन (२००५) आणि थरारपट इन द कट (२००३), झोडियाक (२००७) आणि शटर आयलंड (२०१०) मध्ये काम केले. अवेक अँड सिंग! या ब्रॉडवे पुनरुज्जीवनात सहाय्यक भूमिकेसाठी त्याला टोनी पुरस्कार नामांकन मिळाले. मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या सुपरहिरो मालिकेत २०१२ पासून ब्रूस बॅनर/हल्कच्या भूमिकेमुळे मार्कला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.

द किड्स आर ऑल राईट (२०१०), चरित्रपट फॉक्सकॅचर (२०१४) आणि स्पॉटलाइट (२०१५) या नाटक चित्रपटातील मायकेल रेझेंडेस या शुक्राणू-दात्याच्या भूमिकेसाठी रफालोला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. द नॉर्मल हार्ट (२०१५) या दूरचित्रवाणी नाटक चित्रपटात समलिंगी लेखक आणि कार्यकर्त्याची भूमिकेसाठी त्याने टीव्ही चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड पुरस्कार जिंकला. आय नो धिस मच इज ट्रू (२०२०) या लघु मालिकेत जुळ्यांची दुहेरी भूमिका साकारण्यासाठी मुख्य अभिनेत्याचा प्राइमटाइम एमी पुरस्कार त्याने जिंकला. चारही ईजीओटी नामांकन प्राप्त करणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी मार्क रफालो हा एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →