मार्क वाह्लबर्ग

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

मार्क वाह्लबर्ग

मार्क रॉबर्ट मायकेल वाह्लबर्ग (जन्म ५ जून १९७१), पूर्वी त्याच्या स्टेज नावाने ओळखला जाणारा मार्की मार्क, हा अमेरिकन अभिनेता आहे. त्यांने कॉमेडी, नाटक आणि ॲक्शन शैलींमध्ये काम केले आहे. त्याला एक बाफ्टा पुरस्कार मिळाला आहे. त्याला दोन अकादमी पुरस्कार, तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार, नऊ प्राइमटाइम एमी पुरस्कार, आणि तीन स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहेत.

द डिपार्टेड (२००६) या क्राइम ड्रामामध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केल्याबद्दल त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. स्पोर्ट्स ड्रामा बायोपिक द फायटर (२०१०) मध्ये मिकी वॉर्डच्या भूमिकेसाठी वाहल्बर्गला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. २०१७ मध्ये तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →