मायक्रोसॉफ्ट एक्सेल (इंग्लिश: Microsoft Excel) हे मायक्रोसॉफ्ट कंपनीने बनवलेले, विंडोज व मॅकिंटॉश ओएस एक्स संगणकप्रणाल्यांसाठी वितरलेले स्प्रेडशीट उपयोजन सॉफ्टवेर आहे. ते मायक्रोसॉफ्ट ऑफिस या सॉफ्टवेर संचामधील एक घटक सॉफ्टवेर असून यात वापरकर्त्यांना साधी, गुंतागुंतीची गणिते, स्तंभालेख, व्हीबीए प्रोग्रॅमिंगदेखील करण्याची सुविधा पुरवली आहे. इ.स. १९९३ साली बाजारात आलेल्या मायक्रोसॉफ्ट एक्सेल ५ व्या आवृत्तीपासून हे सॉफ्टवेर विंडोज व मॅकिंटॉश ओएस एक्स प्रणाल्यांवरील स्प्रेडशीट सॉफ्टवेरांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मायक्रोसॉफ्ट एक्सेल
या विषयातील रहस्ये उलगडा.