मानवत हत्याकांड

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

मानवत हत्याकांड हे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात असलेल्या तत्कालीन मानवत या गावात १४ नोव्हेंबर १९७२ ते ४ जानेवारी १९७४ (सुमारे १४ महिने) या काळात झालेले हत्याकांड आहे. यात एकामागून एक तब्बल १२ क्रूर साखळी खून करण्यात आले होते. यामागील मुख्य हेतू गुप्तधन आणि अपत्य प्राप्ती असल्याचे मानले जाते. हेतू प्राप्तीसाठी सात कुमारिका अर्थात दहा वर्षाखालील मुलींची हत्या करून त्यांचे विशिष्ट अवयवातील रक्त वापरण्यात आले. पोलिस आणि सर्वसामान्य नागरिकांना भ्रमित करण्यासाठी चार महिला आणि एक पुरुष यांच्या देखील हत्या करण्यात आल्या.

हे प्रकरण इतके गूढ, गंभीर आणि क्रूर होते की, संध्याकाळी संपूर्ण शहर सामसुम होत असे. तेथील रहिवाशांचे नातेवाईक देखील या गावात जाण्यास टाळत असत. गावातून जाणाऱ्या बसमधील प्रवासी बसच्या खिडक्या बंद करत असत. गावापासून दूर असलेले मानवत रोड रेल्वे स्टेशन आले की गाडीतील प्रवासी गाडीच्या खिडक्या बंद करून बाहेर शहराच्या दिशेने पाहत असत. तत्कालीन विधानसभेत या हत्याकांडावर चर्चेच्या फैरी झडत असत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →