निठारी हत्याकांड

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

निठारी हत्याकांड किंवा २००६ नोएडा मधील हत्यासत्र हे २००५ ते २००६ दरम्यान उत्तर प्रदेश मधील निठारी, नोएडा येथील सेक्टर-३१ मधील व्यापारी मोनिंदर सिंग पंढेर यांच्या घरात घडलेले एक बलात्कार आणि हत्यासत्र आहे. या प्रकरणात मोनिंदर सिंगला पाचपैकी दोन खटल्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणातील सहभागी आरोपी त्याचा नोकर सुरिंदर कोली त्याच्याविरुद्धच्या १६ पैकी १० प्रकरणांमध्ये दोषी ठरला होता. या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र ऑक्टोबर २०२३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणात सीबीआयने एकूण १६ गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी सुरेंद्र कोलीला १४ गुन्ह्यांमध्ये फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तर मनिंदरसिंग पंढेर याच्यावर ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील ३ प्रकरणांमध्ये पंढेरला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती, तर दोन खटल्यांत यापूर्वीच निर्दोष मुक्तता झाली होती. उच्च न्यायालयाने १२ प्रकरणात कोली यांची तर पंढेर यांची २ प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा आणि साक्षीदार नसल्यामुळे उच्च न्यायालयाने या दोघांची ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →