टी.एम. सेल्वागणपती

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

टी.एम. सेल्वागणपती हे भारतीय राजकारणी आहेत. ते १९९१ मध्ये तिरुचेंगोडे मतदारसंघातून निवडून आलेले तामिळनाडू विधानसभेचे सदस्य होते. १९९१ ते १९९६ दरम्यान ते जयललितांच्या सरकारमध्ये स्थानिक प्रशासन मंत्री होते. १९९९-२००४ मध्ये ते सेलम मतदारसंघातून १३ व्या लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले. मूळत: ते अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे सदस्य होत पण ते ऑगस्ट २००८ मध्ये द्रविड मुन्नेत्र कळघममध्ये सामील झाले. २०२४ मध्ये ते पुन्हा सेलम मधून विजयी ठरले.

२ फेब्रुवारी २००० रोजी प्लेझंट स्टे हॉटेल प्रकरणात ट्रायल कोर्टाने त्याला दोषी ठरवले आणि नंतर ४ डिसेंबर २००१ रोजी उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. कलर टीव्ही घोटाळ्यात ३० मे २००० रोजी ट्रायल कोर्टाने त्याला दोषी ठरवले होते आणि नंतर ४ डिसेंबर २००२ रोजी उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली होती.

जून २०१० मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले. २०१४ मध्ये, त्याला एका आर्थिक घोटाळ्यासाठी न्यायालयाने दोषी ठरवले, परिणामी तो अपात्र ठरला. भ्रष्टाचारासाठी संसदेतून अपात्र ठरलेले ते तामिळनाडूतील पहिले राजकारणी ठरले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →