माणिकदौंडी हे गाव महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. माणिकदौंडी येथे जागृत देवस्थान नाथ पंथी मधील एक नाथांचे स्थान असून ते आत्ता सर्वत्र श्री बलखंडी बाबा म्हणून तर बल्लीनाथ कृती समिती म्हणून प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे आणि एकमेव महाराष्ट्रातील असे एक मंदिर आहे की पूर्वी पवित्र मानला जाणारा श्रावण महिन्यात ३ शुक्रवारी श्री बलखंडी बाबा यांची जत्रा भरते ते एक खूप पवित्र नाथ पंथी मंदिर सर्व धर्माचे खूप श्रद्धेचे पवित्र स्थान मानले जाते आहे .
तसेच महाराष्ट्रातील पंढरपूर नंतरचे दुसरे आणि पवित्र असे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचेही मंदिर आहे आणि तेही महाराष्ट्रात एक ऐतिहासिक मानले जाते. माणिकदौंडी हे गाव जरी छोटे असले तरी हिंदूंची एकता आणि धर्माची आस्ता कायम आणि एकजुटीने जपत आहे आणि इथे हिंदू मुस्लिम एकत्र आणि एकजुटीने राहतात तसेच इथे मुस्लिम जनसंख्या गावात ज्यास्त असून हिंदूंची जनसंख्या माणिकदौंडी गावात कमी आहे तसेच माणिकदौंडी गावाला पूर्वी पासून बारा तांडे आणि चोवीस वाड्याचा नाका मानले जाते आणि या बारा तांडे छत्तीस वाड्यांन मध्ये सर्वत्र हिंदू समाज आहे आणि सर्वांचे ग्रामदैवत तसेच श्रद्धेचे पवित्र ठिकाण श्री बलखंडी बाबा जागृत देवस्थान आहे तसेच माणिकदौंडी गावांमध्ये पूर्वी पासून मंदिराच्या वरती कसल्याही प्रकारचे छत्र छाया नसून ते फक्त मोकळ्या वातावरणात उघड्या वरती आहे आणि तिथे चालू पावसातही आजही नऊ नाथांचे नऊ दीपज्योत आहेत आणि ते कायम एकदा पेटवले की पावसातही न विझता जळतात तसेच नऊ नाथांचे उल्लेखनीय आणि साक्षात नऊ समाधी आजही मंदिराच्या पायथ्या लगत आहेत साक्षात नवनाथांचे दर्शन घडल्या सारखेच आहे हे एक खूप मोठे वैभव या माणिकदौंडी गावाला लाभलेले आहे श्री बलखंडी बाबा यांच्या कृपेने.
माणिकदौंडी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?