श्रीमद भागवतात उल्लेख केल्या प्रमाणे श्री वृषभ देवांच्या शंभर पैकी "नऊ नारायण " त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मच्छिंद्रनाथ जी होय . श्री नवनाथ कथासार या मालू कवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला आणि " श्री मच्छिंद्र " हे नाम धारण केले . श्री मच्छिंद्रनाथ जी हे नाथ पंथाचे आद्य नाथाचार्य होत . कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या कौलज्ञाननिर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते. मध्ययुगातील भक्तिचळवळींमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या नाथ संप्रदायाचे ते संस्थापक मानले जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मच्छिंद्रनाथ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.