देवगड (नेवासा)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

देवगड (नेवासा)

देवगड हे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध असे श्री दत्तक्षेत्र असून अहिल्यानगर - छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरील ठिकाण आहे. अहिल्यानगरपासून सुमारे ६६ कि.मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. सदर मंदिर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान प.प. श्री किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला.

संपूर्ण देवगड मंदिराची वास्तु ही अत्यंत देखणी असून प्रामुख्याने दत्तमंदिर आहे. संपूर्ण भव्य मंदिर राजस्थानातील आणलेल्या संगमरवरी दगडातून पूर्ण बांधकाम केलेले आहे. मंदिराचे फरशी कामही संगमरवरी असून मंदिरास ४ फूट उंचीचा सोनेरी कळस आहे. अत्यंत सर्वांगसुंदर प्रसन्न दत्तमूर्ती हेच येथील प्रमुख आकर्षण आहे. ही अत्यंत जिवंत आणि जागृत दत्तमूर्ती आहे. संपूर्ण मंदिर परिसरच अत्यंत मंगल व पवित्र स्पंदनाने भारावलेला आहे. या मंदिर परिसरात दत्तमंदिर, शनीमहाराज, मारुती, मच्छींद्रनाथ, गोरक्षनाथ, नारदमुनी, मार्कंडेय मुनी, सिद्धेश्र्वर, पार्वती, गणेश व कार्तिकस्वामी अशी स्थाने आहेत. दत्तमंदिराच्या बाजूसच श्रीकिसनगिरी महाराजांची समाधी स्थान आहे. येथील महाद्वारच मंदिराचे भव्य दिव्य स्वरूपाची कल्पना देते. येथील गोपुरे अत्यंत सुंदर आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →