नेवासा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एक तालुका आहे.
या तालुक्याचे ठिकाण, प्रवरा नदीच्या काठावर वसलेले नेवासे हे गाव आहे. याच गावात राहून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि पहिल्यांदा वाचून दाखविली.
नेवासा तालुका २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला आहे. यापूर्वी नगर-नेवासा आणि नेवासा-शेवगाव अशा दोन मतदार संघांत तालुका विभागलेला होता. राजकीय दृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या राजकीय पक्षांना अनुकूल असलेला हा तालुका असून अलीकडेच भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचेही बळ वाढतांना दिसत आहे. मारुतराव घुले, यशवंतराव गडाख, वकीलराव लंघे इत्यादी व्यक्तींमुळे तालुक्याची राज्याच्या राजकारणात ओळख टिकून राहिली आहे.
सध्या या सर्वांची पुढची पिढी राजकारणात उतरत आहे.
पूर्वी शेवगाव-नेवासा असा संयुक्त मतदार संघ होता, हा तालुका कायम विद्रोही विचाराचा व परिवर्तनवादी तालुका म्हणून ओळखला जातो. पूर्वी शेवगाव नेवासा असा संयुक्त मतदार संघ असतांना सुद्धा या तालुक्यातील मतदारांनी कधीच शेवगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी निवडून दिला नाही, जरी नरेंद्र पाटील घुले हे शेवगावचे असले तरी त्यांचे कार्यक्षेत्र हे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, भेंडा हे असल्यामुळे ते ही याच तालुक्यातील गणले जातात. ह्या तालुक्यातील मतदारांनी यशवंतराव गडाख यांच्या सारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करून वकिलराव लंघे पाटील यांच्यासारख्या कम्युनिस्ट नेत्याला दोन वेळा आमदार केलं. त्याच लंघे पाटलांचा पराभव करत पुन्हा १० वर्ष काँग्रेसचे संभाजीराव फाटके हे आमदार राहिले, त्यानंतरच्या निवडणुकीत मारुतराव घुले पाटलांसारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करत तरुण व अपक्ष उमेदवार तुकाराम पाटील गडाख हे आमदार झाले, त्यानंतर तुकाराम गडाख यांचा पराभव करत पांडुरंग अभंग यांच्यासारखे राजकारणात अगदी नवखे व सामान्य व्यक्तिमत्त्व निवडून आले, त्यानंतर जवळपास १५ वर्ष कुठलीही सहकारी संस्था, हाताशी नसतांना वकिलराव लंघे यांचे सुपुत्र विठ्ठलराव लंघे यांनी घुले पाटलांना काट्याची टक्कर या निवडणुकांमध्ये लोक त्यांना वर्गणी करून निधी देत असत.
पुढे नेवासा हा स्वतंत्र मतदार संघ झाल्यावर यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव शंकरराव गडाख हे या मतदार संघाचे प्रतिनिधी झाले, विठ्ठलराव लंघे ह्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यातील विरोधक संपला, अस चित्र निर्माण झालं असतांना, काँग्रेसचे तत्कालीन तालुका अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे हे पुढे आले, त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जिल्हापरिषद, पंचायतसमिती निवडणुकीत काँग्रेसने २ जिल्हापरिषद गट व २ पंचायत समिती गणात विजय मिळवला, एक गटात अतिशय निसटता पराभव झाला, त्यानंतर मुरकुटे काँग्रेस मधून भारतीय जनता पार्टीत गेले व शंकरराव गडाखांचा पराभव करून ते निवडून आले, हा तालुका कायम परिवर्तनाला साथ देणारा तालुका आहे.
नेवासा तालुका
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.