माझांदारान प्रांत

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

माझांदारान प्रांत

माझांदारान (फारसी: اُستان مازندران‎‎) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या उत्तर भागात कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर स्थित असून सारी शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. सुमारे ३० लाख लोकसंख्या असलेला माझांदारान इराणमधील सर्वाधिक लोकसंख्या घनतेच्या प्रांतांपैकी एक आहे. मासेमारी व खनिज तेल हे येथील प्रमुख उद्योग आहेत.

अलबुर्ज पर्वतरांगेमधील माउंट दमावंद हे आशियामधील सर्वात उंच ज्वालामुखी शिखर ह्याच प्रांतामध्ये आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →