इलाम प्रांत

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

इलाम प्रांत

इलाम (फारसी: استان ایلام‎, ओस्तान-ए-इलाम, कुर्दी: इलाम) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या पश्चिम भागात इराकच्या सीमेवर वसला आहे. पश्चिमेस ४२५ कि.मी. लांबीची इराकी सीमा असलेल्या या प्रांताच्या दक्षिणेस खुजस्तान, पूर्वेस लोरेस्तान, उत्तरेस कर्मानशाह हे इराणाचे प्रांत आहेत. इलाम शहर या प्रांताचे राजधानीचे शहर आहे. इलाम प्रांताची लोकसंख्या सुमारे ५,४०,००० आहे (इ.स. २००५ सालातील अंदाजानुसार).

इराण–इराक युद्धादरम्यान मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेला हा प्रांत सध्या इराणमधील सर्वात मागासलेल्या प्रांतांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →