महावेली नदी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

महावेली नदी

महावेली ही ३३५ किमी (२०८ मैल) लांबीची नदी असून ती श्रीलंकेतील सर्वात लांब नदी आहे. स्थानिक भाषेत या नदीला महावेली गंगा असे म्हणले जाते. या नदीचे पाणलोट क्षेत्र विस्तीर्ण असून बेटाच्या एकूण भागापैकी जवळजवळ एक पंचमांश भाग त्याने व्यापला आहे. या नदीचा उगम देशाच्या पश्चिमेकडील हॅटन पठारावर पोलवतुरा या दुर्गम गावात होतो. ही नदी ईशान्य किनाऱ्यावरील त्रिंकोमालीच्या खाडीमार्गे बंगालच्या उपसागराला मिळते. त्रिंकोमाली हे नैसर्गिक बंदर असून जगातील खोल समुद्रावरील बंदरांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →