महाराष्ट्र राज्यात ६ राष्ट्रीय उद्याने, ५२ अभयारण्ये, 6 संवर्धन राखीव क्षेत्र अशी एकूण ५८ वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आहेत. त्याचे एकूण क्षेत्रफळ १००५४.१३ किमी२ म्हणजे राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३.२६ टक्के इतके आहे.
राज्यातील १९ संरक्षित क्षेत्रांचा समावेश करून (६ राष्ट्रीय उद्याने आणि १४ अभयारण्ये) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, नागपूरचा पेंच व्याघ्र प्रकल्प, अमरावतीचा मेळघाट व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूरचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि बोरचा व्याघ्र प्रकल्प असे सहा व्याघ्र राखीव क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. यापैकी बोर व्याघ्र प्रकल्पाची कार्यवाही सध्या सुरू आहे.
महाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.