महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ ही दिनांक १५ ऑक्टोबर २०१४ रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच फेरीत घेतली गेली. ह्या निवडणुकीमधून महाराष्ट्र विधानसभेमधील सर्व २८८ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. १९ ऑक्टोबर २०१४ रोजी मतमोजणी व निवडणुकीचे निकाल घोषित केले गेले. यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या. शिवसेनेस ६३, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या.

२०१४ लोकसभा निवडणुकांमधील अपयशाच्या पार्श्वभूमीवर सत्तेवर असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्यांनी आपली आघाडी मोडत निवडणुक वेगळ्याने लढवण्याचे ठरवले. तसेच जागावाटपावरून एकमत होऊ न शकल्यामुळे भारतीय जनता पक्ष व शिवसेना ह्यांची २५ वर्षे सुरू असलेली युतीदेखील संपुष्टात आली. ह्यामुळे महाराष्ट्रामधील सर्व प्रमुख मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढत झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →