वन विभाग (महाराष्ट्र शासन) हा भारतीय महाराष्ट्र राज्याचा प्रशासकीय विभाग असून विशेषतः वनसंवर्धन, वनसंरक्षण, वनीकरण आणि वन्यजीव व्यवस्थापनासाठी जबाबदार आहे.
महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय नागपुरात आहे.
अमरावती,
औरंगाबाद (संभाजीनगर),
धुळे,
गडचिरोली,
चंद्रपूर वनवृत्त
कोल्हापूर,
नागपूर,
नाशिक,
पुणे,
ठाणे आणि
यवतमाळ
येथे ११ प्रादेशिक वनवृत्ते (Circle's) आहेत.
वन्यजीव विभाग वन्यजीव (बोरिवली) , वन्यजीव (नागपूर) आणि वन्यजीव (नाशिक) अशा ३ वन्यजीव मंडळात विभागला आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक यांचे कार्यालय नागपुरात असून ते वनदलप्रमुख (HoFF) असतात. तेच महाराष्ट्रातील वनविभागाचे प्रशासकीय प्रमुख असतात.
वनहक्क कायद्यांतर्गत वनक्षेत्रातील आदिवासींचे हक्कही वनविभागाद्वारे नियंत्रित केले जातात.
महाराष्ट्र वन विभाग
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!