मलेशिया महिला क्रिकेट संघाचा जपान दौरा, २०२६ हा सप्टेंबर २०२६ मध्ये झालेला महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा होता. मलेशिया महिला क्रिकेट संघाने ११ ते १३ सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी जपानचा दौरा केला.
मालिकेतील सर्व सामने सनो येथील सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान येथे आयोजित करण्यात आले होते. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. १२ सप्टेंबरला नियोजित दुसरा सामनाही पावसामुळे रद्द झाला आणि तो १३ सप्टेंबरला पुनर्नियोजित करण्यात आला. पुनर्नियोजित दुसरा सामना मलेशियाने १८ धावांनी जिंकला, तर तिसरा सामना जपानने ११ धावांनी जिंकला. त्यामुळे तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत संपली.
मलेशिया महिला क्रिकेट संघाचा जपान दौरा, २०२६
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!