मलिक अंबरची कबर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

मलिक अंबरची कबर

मलिक अंबरची कबर ही भारतातील महाराष्ट्र राज्यातील खुलताबाद येथी अहमदनगर सल्तनतच्या पेशवा मलिक अंबरची कबर आहे. मलिकअंबरने ही कबर स्वतःसाठी बांधून घेतली. १६२६ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्याला तेथे दफन करण्यात आले. हे भारतातील राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक आहे.



मलिक अंबर गुलाम होता परंतु आपल्या कर्तृत्त्वाने १७ व्या शतकाच्या सुरुवातीला अहमदनगर सल्तनतचा पेशवा (पंतप्रधान) झाला. अंबरने औरंगाबादमधील नेहेर जलप्रणाली तसेच अनेक मशिदी आणि थडग्यांचे बांधकाम करून घेतले. त्याने आपली स्वतःची कबर स्वतःच बांधून घेतली होती.

याचे स्थापत्य शाही कबरींसारखे आहे.

मलिक अंबरच्या थडग्यापासून काही मीटर नैऋत्येस एक मोडकळीस आलेले लहान थडगे आहे. यावर काही शिलालेख नसल्यामुळे या थडग्यात कोणाला पुरले आहे हे माहित नाही, परंतु ते अंबरच्या नातवाचे असल्याचे मानले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →