सत्यपाल मलिक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सत्यपाल मलिक

सत्यपाल मलिक (२४ जुलै, १९४६ - ५ ऑगस्ट, २०२५) हे मेघालयचे १९ वे आणि वर्तमान राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले भारतीय राजकारणी आहेत. ते गोव्याचे १८ वे राज्यपाल होते. मलिक हे पूर्वीच्या जम्मू-काश्मीर राज्याचे राज्यपालही होते. ते ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर १०१९ पर्यंत जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल होते आणि त्यांच्या कार्यकाळातच जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा घटनात्मक निर्णय ५ ऑगस्ट २०१९ रोजी घेण्यात आला.

याचे पहिले प्रमुख राजकीय पद १९७४-७७ दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्यत्व होते. १९८० ते १९८६ आणि १९८६-८९ या काळात त्यांनी उत्तर प्रदेशचे राज्यसभेत प्रतिनिधित्व केले. १९८९ते १९९१ या काळात ते जनता दलाचे सदस्य म्हणून अलीगढमधून ९ व्या लोकसभेचे सदस्य होते. ते ऑक्टोबर २०१७ ते ऑगस्ट २०१८ पर्यंत बिहारचे राज्यपाल होते. २१ मार्च २०१८ रोजी त्यांना २८ मे २०१८ पर्यंत ओडिशाचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांची जम्मू आणि काश्मीर राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →