आचार्य देवव्रत

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

आचार्य देवव्रत

आचार्य देवव्रत (जन्म:१८ जानेवारी १९५९) हे एक भारतीय शिक्षणतज्ञ आहेत जे जुलै २०१९ पासून गुजरातचे राज्यपाल आहेत. ते आर्य समाजाचे प्रचारक आहेत आणि त्यांनी यापूर्वी कुरुक्षेत्र, हरियाणा येथील गुरुकुलाचे प्राचार्य म्हणून काम केले आहे.

गुजरातचे राज्यपाल असल्याने ते गुजरातच्या राज्य विद्यापीठांचे कुलपतीही आहेत. जून २०१९ मध्ये, ओम प्रकाश कोहलीच्या जागी गुजरातचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

आचार्य देवव्रत हे आर्य समाजी असून ते नैसर्गिक शेती देखील करतात. त्यांनी १८० एकर क्षेत्रावर

नैसर्गिक शेतीचा प्रयोग केला आहे. नर्मदा, गुजरात येथील एका नैसर्गिक शेती शिबिरात त्यांनी म्हणले की,



देव प्रसन्न व्हावा म्हणून लोक मंदिरात जातात, मशिदीत जातात, गुरुद्वाऱ्यात जातात, चर्च मध्ये जातात. पण मला सांगायचे आहे की तुम्ही लोक नैसर्गिक शेती करायला लागाल तर देव आपोआप प्रसन्न होईल.



सध्या जी रासायनिक शेती केली जात आहे, त्याद्वारे तुम्ही प्राणी मारण्याचे काम करत आहात, नैसर्गिक शेती केल्यास जीवदानाचे काम होईल. मनुष्य हा एक असा प्राणी आहे, त्याच्यासारखा ढोंगी, कृत्रिम आणि दांभिक दुसरा कोणी नाही.



तुम्ही 'गौ माता की जय' म्हणता, तिची पूजा करता, तिलक लावता, तुम्ही घंटा वाजवता, पण गाय जर दूध देत नसेल तर तिला घराबाहेर हाकलून देता. गौ माते तुला नमस्कार असो. म्हणूनच मी म्हणतो हिंदू समाज हा ढोंगी नंबर वन आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →