मत्स्यगंधा एक्सप्रेस (कन्नड: ಮತ್ಸ್ಯಗಂಧ ಎಕ್ಷ್ಪ್ರೆಸ್ಸ) ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते कर्नाटकातील मंगळूर स्थानकांदरम्यान रोज धावते. कोकण रेल्वेमार्गे धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस मुंबई ते मंगळूर दरम्यानचे १,१८६ किमी अंतर १६ तासांत पूर्ण करते. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशामधून जात असलेल्या ह्या गाडीला येथील मासेमारी उद्योगाशी निगडीत मत्स्यगंधा हे नाव दिले गेले आहे.
१ मे १९९८ रोजी सुरू झालेली ही कोकण रेल्वेवरील सर्वात प्रथम गाड्यांपैकी एक होती.
मत्स्यगंधा एक्सप्रेस
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.