रत्नागिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नगर आणि रत्नागिरी जिल्ह्याचे ठिकाण आहे. हे नगर अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे. कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.
हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्नागिरी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणितज्ज्ञ रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्न विनोबा भावे, भारतरत्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहे.
रत्नागिरी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.