मणिपूरचे मुख्यमंत्री हे भारताच्या मणिपूर राज्याचे सरकारप्रमुख व मणिपूर विधानसभेचे प्रमुख नेता असतात. पाच वर्षांचा कार्यकाळ असलेले मुख्यमंत्री हे विधानसभा निवडणुकांद्वारे निवडले जातात व मणिपूरच्या राज्यपालाकडून त्यांचू पदनियुक्त केली जाते. मुख्यमंत्री व त्याने नियुक्त केलेले मंत्रीमंडळ हे मणिपूर राज्याच्या कामकाजासाठी जबाबदार आहेत.
१९६३ सालच्या मणिपूर राज्याच्या स्थापनेनंतर आजवर १२ व्यक्ती मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत ज्यांपैकी ५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. २००२ ते २०१७ असे १५ वर्ष कार्यकाळ सांभाळणारे ओक्राम इबोबी सिंह हे सर्वाधिक काळ व सतत पदस्त असे मुख्यमंत्री होते. भारतीय जनता पक्षाच्या विजया नंतर एन. बीरेन सिंह हे २०१७ पासून विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
मणिपूरचे मुख्यमंत्री
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?