१ ऑक्टोबर १९५३ रोजी मद्रास राज्यातून आंध्र राज्याची निर्मिती झाली. १ नोव्हेंबर १९५६ रोजी हैदराबाद राज्याचे अस्तित्त्व संपुष्टात आले व त्याचा तेलगू भाषिक भाग, तेलंगणा, आंध्र राज्यात जोडला गेला. संयुक्त आंध्र प्रदेश या नवीन राज्याची स्थापना झाली आहे. ५८ वर्षांनंतर, २ जून २०१४ रोजी आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा, २०१४ द्वारे राज्याचे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये विभाजन करण्यात आले.
कोंडा वेंकट रंगा रेड्डी हे संयुक्त आंध्र प्रदेशचे पहिले उपमुख्यमंत्री होते ज्यांची १९५९ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती.
२०१४ मध्ये नारा चंद्राबाबू नायडू यांच्या मुख्यमंत्रिपदाखाली निम्मकायला चिनाराजप्पा आणि केई कृष्णमूर्ती हे आंध्रचे पहिले उपमुख्यमंत्री झाले.
२०१९ मध्ये, पुष्पश्रीवाणी पमुला आंध्र प्रदेशात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या.
आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.