मटकी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

मटकी

मटकी (मठ; हिंदी - मोट; गुजराती - मठ, मट; कानडी - मडिके; संस्कृत - मुकुष्टक, वनमुग्द; इंग्रजी - ॲकोनाइट बीन, मट अथवा मॉथ बीन; लॅटिन - विग्ना ॲकॉनिटिफोलिया; कूल - लेग्युमिनोजी; उपकुल - पॅपिलिऑनेटी). हे एक वर्षायू (जीवनक्रम एका हंगामात पूर्ण होणारे) व लागवडीतील कडधान्य आहे.

मटकीचा वेल किंवा झुडूप असतो. ही मूळची भारतातील असून भारतात सर्वत्र (हिमालय ते कन्याकुमारीपर्यंत; वायव्य भारतात १,२०० मी. उंचीपर्यंत) आढळते; रानटी अवस्थेत मात्र आढळत नाही. विग्नार या वंशात हल्ली मूग, उडीद, तूर, चवळी यांचा समावेश केलेला असून त्यांच्याशी साम्य आढळल्याने आता त्या वंशात मटकीचाही समावेश करतात. ह्या वनस्पतीच्या खोडावर व फांद्यांवर बारीक केस तुरळकपणे असून पाने सोपपर्ण (तळाशी लहान उपांगे असलेली), संयुक्त व त्रिदली असतात; प्रत्येक दलाचे तीन ते पाच विभाग (दलके) असतात. उपपर्णे अरुंद व टोकदार असतात. खोडावर लहान पिवळ्या फुलांच्या मंजिऱ्या लांबट दांड्यावर येतात; शिंबा (शेंगा) लहान, गोलसर व २.५ – ६ सेंमी. लांब असून त्यांत ६ – १२, किंचित लांबट (४ X २ मिमी.) व पिंगट बिया असतात; प्रत्येक बीजात दोन जाड व लांबट दलिका असतात व पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) नसतो. फुलाची संरचना साधारणपणे अगस्ता किंवा वाटाणा यांच्या फुलांप्रमाणे पतंगरूप असते; स्वपरागणाने (एकाच फुलातील पराग व स्त्री - केसराचा– किंजल्काचा – संपर्क होऊन) बीजोत्पादन होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →