अळीव

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

अळीव (पर्यायी नाव:हळीव, अहाळीव) (गार्डन क्रेस सीड्‌स - garden cress seeds) - Lepidium sativum, हे एक अत्यंत पौष्टिक असे तेल-बी आहे. १०० ग्रॅम हळिवांत तब्बल १०० मिलिग्रॅम आयर्न आहे. लोह, कॅल्शियम, फॉलेट, बेटाकेरोटीन, क जीवनसत्त्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक हळिवांत आहेत. हळीव हे रजःस्राव नियमित करण्यात मदत करते, तसेच त्यातील ॲंटिऑक्‍सिडंट्‌स व रक्‍तशुद्धी करणाऱ्या घटकांमुळे हळीव हे तरुणींसाठी उपयुक्‍त ठरते. बाळंतिणीचे दूध वाढवण्यासाठी हळिवाचे लाडू किंवा खीर देण्याची पूर्वापार पद्धत आपल्याकडे आहे. अंगकाठी भरायला मदत होते. अंकुरलेले हळीव सलाडमध्ये घालून घेतल्यास ते डोळ्यांसाठी हितकर आहेत. हळिवांतील चिकट गुणधर्मामुळे मलाविरोधाची तक्रार कमी करण्यासाठी यांचा वापर करता येतो. हळिवाच्या गॉयट्रोजेनिक गुणधर्मामुळे हायपोथायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी या बियांचे पदार्थ खाऊ नयेत.

अळीव किंवा हळीव म्हणून ओळखिली जाणारी तेलबिया देणारी ही भारतात उगवणारी, मूळ्ची इथियोपियातली एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. बाळंतिणीस अंगावर दूध येण्यास हळिवाची खीर देतात. अळिवाचे लाडूही करतात.

हळिवाला हिंदीत हलीम म्हणतात.या नवनस्पतीला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.



संस्कृत :चंद्रशूर

हिंदी :हालिम, चंसुर, चनसूर, चमसूर

बंगाली :हालिम

गुजराती :अशेळियो

कानडी :अल्लीबीज, कुरूतिगे

मल्याळम :

तामिळ : आलि विदै

तेलुगू : अमोल

इंग्रजी :Garden Cress

फार्सी- :लमतुख्मतरातेजक

शास्त्रीय नाव : Lepidium sativum

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →