कर्दळ (Indian Shot) ही कॅनेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव कॅना इंडिका असे आहे. ही मूळची वेस्ट इंडीज आणि मध्य व दक्षिण अमेरिका येथील आहे. कर्दळ ही मोठी, बहुवर्षायू व शोभादायक ओषधी असल्यामुळे भारतात बागेमध्ये तिच्या अनेक जाती आढळतात.
कर्दळीचे जमिनीखालील खोड (मूलक्षोड) जाड असते. तिचे जमिनीवरील खोड ०.९-१.२ मीटर उंच असते. पाने साधी व आकाराने मोठी असतात. फुले अनियमित, द्विलिंगी, जोडीने, लाल, शेंदरी व मिश्र रंगांची असतात. बिया अनेक, काळ्या, लहान, गोलाकार व छऱ्यांप्रमाणे असतात. त्यामुळे या वनस्पतीला इंडियन शॉट असेही म्हणतात.
कर्दळ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?