मंगेश बोरगांवकर

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मंगेश बोरगावकर (जन्म - १५ ऑक्टोबर १९८९) हा एक मराठी गायक आहे. हा सा रे ग म प या मराठी कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचा उपविजेता होता. नाही कळले कधी, तुझ्याविना ही त्याने गायलेली गाणी लोकप्रिय आहेत. मंगेश बोरगावकर याने अनेक मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे.

मंगेश याने सुरेश वाडकर, शौनक अभिषेकी, शंकर महादेवन, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, रवींद्र साठे यांच्या समवेत गाण्यांच्या अनेक मैफिलीत सहभाग घेतला आहे. चित्रपट दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते महेश कोठारे यांनी मी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीसाठी आयोजित केलेल्या कशासाठी, प्रेमासाठी या कार्यक्रमात मंगेश याने आपली कला सादर केली.

एबीपी माझा वाहिनीसाठी फेस्टिवल ऑफ लव्ह हा कार्यक्रम मंगेश याने सादर केला. स्टार प्रवाह वाहिनीवरील तुजवीण सख्या रे या लोकप्रिय मालिकेचे शीर्षकगीत मंगेश याने गायले आहे. यासोबतच अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी त्याने आजवर आपली कला सादर केली आहे. तसेच अनेक लाईव्ह शोच्या माध्यमातून त्याने आपली कला सादर केली आहे. दिवाना झालो तुझा हा मंगेश याच्या गाण्यांचा संग्रह प्रचंड लोकप्रिय ठरला. या संग्रहामधील गाणी सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केली आहेत.

मंगलाष्टक वन्स मोअर या मराठी चित्रपटासाठी उसवले धागे हे द्वंद्वगीत मंगेश याने गायले आहे. मेरा देश महान या हिंदी सिनेमासाठी मंगेश याने पार्श्वगायन केले आहे. गाणे मंगेशाचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीद्वारे लातूर येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मोफत राहण्याची व शिक्षणाची सोय बोरगावकर कुटुंबियांच्या वतीने करण्यात येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →