रोहित राऊत

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

रोहित राऊत

रोहित राऊत हा एक मराठी गायक आहे. झी टी.व्ही. या हिंदी वाहिनीवरील सा रे ग म प लिटील चॅम्प्स या कार्यक्रमात याने भाग घेतला होता. यासोबतच झी मराठी वाहिनीवरील सा रे ग म प लिटील चॅम्प्स या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वातील अंतिम ५ स्पर्धकांमध्ये त्याने स्थान पटकावले होते.

रोहित याने अनेक मराठी चित्रपट व मालिकांसाठी पार्श्वगायन केले आहे. रोहित याने लातूर येथील गुरुवार संगीत महाविद्यालय येथे संगीताचे शिक्षण घेतले आहे. दुनियादारी या चित्रपटातून त्याने प्लेबॅक गायक म्हणून पदार्पण केले असून गेली अनेक वर्षे रोहित राऊत गायन आणि संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. अगदी लहान वयापासून या क्षेत्रात नाव कमावत असून आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा गायक म्हणून त्याने ओळख प्राप्त केली आहे. मोगरा फुलला या चित्रपटाद्वारे त्याने संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →