भोपाळ मेट्रो (भोज मेट्रो म्हणूनही ओळखली जाते) ही भारतातील मध्य प्रदेश राज्याची राजधानी असलेल्या भोपाळ शहराला सेवा देणारी जलद परिवहन प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये एकूण १०४.८७ किलोमीटर (६५.१६ मैल) लांब ६ मार्गांचे जाळे असणार आहे. भोपाळ मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २८ किमी (१७.४० मैल) लांबीच्या मार्ग क्रमांक २ आणि ५ वर बांधकाम चालू आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ८० billion (US$१.७८ अब्ज) चा खर्च होणार आहे. या मार्गिका भूतळावर, उन्नत मार्गांवरआणि काही ठिकाणी भूमिगत असतील. एम्स ते सुभाष नगर दरम्यानच्या प्राधान्य मार्गाचे उद्घाटन २१ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भोपाळ मेट्रो
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.