भुसावळ हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.
भुसावळ हे गाव उत्तर महाराष्ट्रात येते. भारतातल्या मोठ्या रेल्वे जंक्शनपैकी हे एक आहे. मनमाड, भोपाळ आणि नागपूरकडे जाणारे रेल्वेमार्ग भुसावळहून निघतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भुसावळ हे आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड आहे. येथे आशिया खंडातले रेल्वेचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे इंजिन प्रांगण (लोकोमोटिव्ह यार्ड) आहे. भुसावळ शेजारीच दोन आयुध निर्माण कारखाने व एक औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे. भुसावळ हे गाव तापी नदीशेजारी वसले आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास ४ लाख आहे.
भुसावळ हे 21°02′50.56″N 75°47′15.99″E वसलेले आहे. त्याची सरासरी उंची २०९ [ ६८५ फूट ] मीटर आहे . भुसावळ हा जळगावातील सर्वात मोठा तालुका आहे, आणि हा तालुका राष्ट्रीय महामार्ग ६ वर वसलेला आहे. जग प्रसिद्ध अजिंठा लेणी येथून अवघ्या ६० किलो मीटर अंतरावर आहे. भुसावळची इंग्लिश मधील स्पेलिंग [ Bhusawal & Bhusaval ]
Central Goverment India आंनी नगरपालिकेने वापरली आहे .
भुसावळ
या विषयावर तज्ञ बना.