भुवन अरोरा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

भुवन अरोरा

भुवन अरोरा हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करतो. तो टेलीव्हिजन मालिका द टेस्ट केस (२०१८) आणि फर्जी (२०२३) मध्ये दिसला आहे.

अरोरा यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये शिक्षण घेतले आणि शुद्ध देसी रोमान्स (२०१३), तेवर (२०१५) आणि नाम शबाना (२०१७) या चित्रपटांमधील छोट्या भूमिकांद्वारे त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. यशराज फिल्म्सने निर्मीत केलेल्या बँक चोर (२०१७) या कॉमेडी चित्रपटात त्याला अधिक महत्त्वाची भूमिका मिळाली. त्यानंतर त्याने २०१८ च्या द टेस्ट केस मालिकेत रोहन राठौर, एक चंगळवादी सैन्य इच्छुकाचे पात्र रंगवले. २०२० मध्ये, नेटफ्लिक्स चित्रपट चमन बहारमध्ये त्याची सहाय्यक भूमिका होती.

२०२३ मध्ये, अरोराने शाहिद कपूरसोबत ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ क्राईम ड्रामा मालिका फर्जीमध्ये काम केले. न्यूज१८ च्या समिक्षक दिशा शर्माला त्यांची "कॉमिक टाइमिंग आणि डायलॉग डिलिव्हरी" "प्रभावी" वाटली. दिप्रिंट च्या निधिमा तनेजा यांना "त्याच्या अभिनयातील चपखलपणा आणि मुंबईय्या बोलीभाषेतील त्याचे वाक्य" आवडले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →