फर्जी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

फर्जी ही एक भारतीय, हिंदी भाषेतील ब्लॅक कॉमेडी क्राइम थ्रिलर दूरचित्रवाणी मालिका आहे. ही मालिका राज आणि डीके यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केली असून, त्यांनीच सीता मेनन आणि सुमन कुमार यांच्यासोबत मालिकेचे सह-लेखनदेखील केले आहे. यात शाहिद कपूर, विजय सेतुपती, के.के. मेनन, राशी खन्ना आणि भुवन अरोरा यांच्या मुख्य भूमिका आहेत. बनावट पैसे कमवण्याचा निर्णय घेणाऱ्या एका निराश कलाकाराची कथा ही मालिका सांगते.

सुरुवातीला २०१४ मध्ये एक चित्रपट म्हणून संकल्पित असलेल्या, फर्जीचा २०१९ पर्यंत दूरचित्रवाणी मालिकेत रुपांतर करण्यात आले. जुलै २०२१ मध्ये मुंबईत मुख्य छायाचित्रण सुरू झाले. अलिबाग, गोवा, नेपाळ, जॉर्डन येथेही चित्रीकरण झाले. सचिन-जिगर आणि तनिष्क बागची यांनी गाणी संगीतबद्ध केली, तर केतन सोढा यांनी पार्श्वसंगीत दिले. ही मालिका राज आणि डीकेची गुप्तचर मालिका द फॅमिली मॅनचा भाग आहे.

ही आठ भागांची मालिका १० फेब्रुवारी २०२३ रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली. फर्जीला सकारात्मक पुनरावलोकने मिळाली असून ती सर्वाधिक पाहिली जाणारी भारतीय प्रवाह मालिका म्हणून उदयास आली. फेब्रुवारी २०२३ च्या अखेरीस, कपूरने पुष्टी केली की हा कार्यक्रम दुसऱ्या सीझनसाठी परत येईल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →