भुईमूग

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

भुईमूग

भुईमूग हे एक शेंगावर्गीय पीक आहे. हे उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घेतले जाते, हे लहान आणि मोठ्या व्यावसायिक उत्पादकांसाठी महत्त्वाचे आहे. २०१६ मध्ये सोललेल्या शेंगदाण्यांचे जगातील वार्षिक उत्पादन ४४ दशलक्ष टन होते. वनस्पतिशास्त्रज्ञ कार्ल लिनीयस याने या प्रजातीला हायपोगायिया म्हणजे "जमिनीच्या खाली" असे नाव दिले.

भुईमूग हा फॅबॅसी या वनस्पती कुटुंबातील आहे. भुईमुगामध्ये मुळावरील गाठींमध्ये नायट्रोजन-स्थिर करणारे जीवाणू असतात. शेंगदाणे मानवी शरीरासाठी पौष्टिक मानले जातात. ते अक्रोड आणि बदामासारखेच असतात आणि पाश्चात्य पदार्थांमध्ये समाविष्ट केले जातात.

भुईमूग हे तेलवर्गीय महत्त्वाचे नगदी पीक आहे. पण काळाच्या ओघात त्याचे महत्त्व अन्नपीक म्हणूनसुद्धा वाढीस लागले आहे. या पिकात निरनिराळ्या हवामानात जुळवून घेण्याची क्षमता आहे. तसेच हे पीक फेरपालटीस आणि आंतरपीक म्हणून घेण्यास अत्यंत उपयुक्त आहे. या पिकामुळे जमिनीची सुपीकता वाढते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →