भीमसेन खुराणा (२४ नोव्हेंबर १९३६ - १७ एप्रिल २०१८) एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक आणि ॲनिमेटर होता. त्यांचे गुरू राम मोहन यांच्यासह ते भारतीय ॲनिमेशनचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. ॲनिमेशनमधील विविध कामांसाठी त्यांना अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.
अमोल पालेकर व झरीना वहाब अभिनीत समीक्षकांनी प्रशंसित घरोंदा (१९७७) आणि शर्मिला टागोर व उत्तमकुमार अभिनीत दुरियां (१९७९) दिग्दर्शित करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. १९७० च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या एक और एकता (१९७४) या ॲनिमेशन लघुपटासाठीही ते ओळखले जातात. भीमसेन यांनी भारतातील सर्वात मोठी ॲनिमेशन मालिका वर्तमान (१९९४) दिग्दर्शित केली आहे.
भीमसेन खुराणा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.