भारतीय-उत्कीर्ण-लेखसंग्रह ह्या योजनेचे इंग्रजी नाव आहे कॉर्पस् इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम. ह्या योजनेची सुरुवात इ.स. १८७८ साली झाली. ह्या योजनेचे फलित म्हणजे आजवर ह्या योजनेद्वारे प्रसिद्ध झालेले सात खंड आणि तदनुषगांने भारतातल्या काही प्राचीन राजघराण्यांच्या पुराभिलेखांचे सुसूत्र एकत्रीकरण. प्राचीन भारतीय इतिहासलेखनाच्या दृष्टीने पुराभिलेखांना अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. हे लेखन कठीण अशा पदार्थावर अणकुचीदार साधन वापरून कोरून केले जात असे त्यामुळे या लेखांस कोरीव लेख वा उत्कीर्ण लेख असेही म्हणले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय-उत्कीर्ण-लेखसंग्रह-योजना
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.