भारतीय संविधानाची ८वी घटनादुरुस्ती

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

भारतीय संविधानाची आठवी घटनादुरुस्ती, जी अधिकृतपणे संविधान (आठवी दुरुस्ती) अधिनियम, १९५९ म्हणून ओळखली जाते. हिने लोकसभा आणि राज्य विधानसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी जागांचे आरक्षण आणि अँग्लो-इंडियन लोकांचे प्रतिनिधित्व यांचा कालावधी दहा वर्षांसाठी, म्हणजेच २६ जानेवारी १९७० पर्यंत वाढवण्यासाठी संविधानाच्या अनुच्छेद ३३४ मध्ये दुरुस्ती केली. अनुच्छेद ३३४ मध्ये असे नमूद केले होते की ह्या जागांचे आरक्षण संविधानाच्या प्रारंभापासून, म्हणजे २६ जानेवारी १९६० पासून, दहा वर्षांच्या कालावधीत संपुष्टात आले पाहिजे.



आठव्या घटनादुरुस्तीने ह्या आरक्षणाचा कालावधी १९७० पर्यंत वाढवला. आरक्षणाचा कालावधी अनुक्रमे २३ व्या, ४५ व्या, ६२ व्या, ७९ व्या, ९५ व्या आणि १०४ व्या घटनादुरुस्तीद्वारे १९८०, १९९०, २०००, २०१०, २०२० आणि २०३० पर्यंत वाढवण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →