भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाविरुद्ध सामने खेळण्यासाठी एप्रिल २०२६ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. या दौऱ्यावर पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांचा समावेश होता. हे सामने २०२६ महिला टी२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी दोन्ही संघांसाठी तयारीचा भाग म्हणून खेळले गेले. जानेवारी २०२६ मध्ये, 'क्रिकेट दक्षिण आफ्रिका'ने (CSA) २०२६ च्या मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून या दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२६
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?