भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००५-०६

यामागील विज्ञान आणि इतिहास.

भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००५-०६

भारतीय क्रिकेट संघाने २००५-०६ च्या मोसमात पाकिस्तानचा दौरा केला. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघाचे मोसमात कसोटी क्रिकेट खेळून झाले होते. भारताने श्रीलंकेला मायदेशी २-० ने हरवले होते तर तितक्याच फरकाने पाकिस्तानने इंग्लंडवर विजय मिळवला होता. भारताची नोव्हेंबर २००५ मधील, दक्षिण आफ्रिकेविरूद्धची एकदिवसीय मालिका २-२ अशी अनिर्णितावस्थेत संपली होती तर पाकिस्तानने डिसेंबर २००५ मध्ये इंग्लंडला ३-२ असे हरवले होते.

७ जानेवारी २००६ रोजी सुरू झालेल्या दौऱ्यात भारताचा पहिला सामना पाकिस्तान अ संघाबरोबर झाला, आणि १९ फेब्रुवारी रोजी कराचीतील एकदिवसीय सामन्याने दौऱ्याची सांगता झाली.

पाकिस्तानचा कर्णधार, इंझमाम-उल-हक, म्हणाला की सुरुवातीला कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाला वरचढ मानला गेला, परंतु माजी तेजगती गोलंदाज सरफराज नवाझच्या मते भारतीय फलंदाजांना बाद करणे सोपे आहे. २००५ च्या शेवटी आयसीसी कसोटी क्रमवारीत भारत दुसऱ्या तर पाकिस्तान चवथ्या स्थानावर होते, आणि एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तान तिसऱ्या तर भारत पाचव्या स्थानावर होता.

पाकिस्ताने कसोटी मालिकेत विजय मिळवला तर भारताने एकदिवसीय मालिका ४-१ अशी सहज जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →