भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२४-२५

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२४-२५

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघा विरुद्ध खेळण्यासाठी नोव्हेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात पाच कसोटी सामने आणि तीन प्रथम श्रेणी सराव सामने खेळवले गेले. कसोटी सामने २०२३-२०२५ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती. मार्च २०२४ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ने कसोटी मालिकेसाठी ठिकाणांची घोषणा केली. १९९२ नंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची ही पहिली कसोटी मालिका होती. २६ मार्च २०२४ रोजी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संपूर्ण दौऱ्याच्या कार्यक्रमाची पुष्टी केली.

२०२३ मध्ये मागील मालिकेत ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभूत केल्यानंतर भारताने बॉर्डर-गावस्कर चषक राखला होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →